जतचा दुष्काळ लवकरच संपणार? 65 गावांना पाणी, 26,500 हेक्टर सिंचनाचा मार्ग मोकळा

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
म्हैसाळ-जत विस्तारित उपसा सिंचन योजनेतील बोगद्याचा अंतिम टप्पा पूर्ण झाल्यानंतरचे दृश्य. (छायाचित्र : Sangli Today)

मिरज : दुष्काळी जत तालुक्यासाठी महत्त्वाचा मानला जाणारा म्हैसाळ-जत विस्तारित उपसा सिंचन योजनेतील बोगदा कामाचा अंतिम टप्पा पूर्ण झाला आहे. प्रकल्पातील बोगद्याचा ‘ब्रेकथ्रू’ झाल्याने लाभ क्षेत्रातील 65 गावांपर्यंत पाणी पोहोचविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या योजनेचे एकूण सिंचन क्षेत्र 26 हजार 500 हेक्टर असून पाणी वापर क्षमता 5 टीएमसी इतकी आहे. लाभ क्षेत्रात जत तालुक्यातील पूर्णतः वंचित 48 गावे आणि अंशतः वंचित 17 गावे अशी एकूण 65 गावे समाविष्ट आहेत.

₹1028.68 कोटींच्या निविदा कामापैकी सुमारे 57 किलोमीटर लांबीच्या कामांपैकी 51 किलोमीटर म्हणजेच 91 टक्के काम पूर्ण झाले आहे. तीन पंपगृहांपैकी एकाचे काम पूर्ण झाले असून उर्वरित दोन पंपगृहांची कामे सुरू आहेत. प्रकल्पातील दोन वितरण कुंडांचे काम 100 टक्के पूर्ण झाले आहे.

या बोगद्याचे काम पूर्ण झाल्यामुळे लवकरच जतच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचणार आहे. दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प जीवनदायी ठरणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

हेही वाचा: राज्यात 2000 नवीन ग्रंथालयांना मान्यता; सांगलीतील ग्रंथोत्सवात पालकमंत्र्यांची घोषणा.

TAGGED:
Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा