Miraj News : मिरजेत सोमवारपासून अंबाबाई नवरात्र महोत्सव – 71 वर्षांच्या परंपरेतून रसिकांना सुरेल मेजवानी

Sangli Today Desk
Sangli Today Desk
Sangli Today Desk ही सांगली टुडे न्यूजची संपादकीय टीम आहे. आमची टीम सांगली जिल्ह्यातील सत्यापित बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवते — सामाजिक कार्यक्रम, शिक्षण, शेती, आरोग्य, कायदा व...
Miraj Ambabai Navratra Sangeet Mahotsav 2025

Miraj Ambabai Navratra Sangeet Mahotsav 2025 | मिरज : मिरजेतील ऐतिहासिक अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सव यंदा 71 व्या वर्षी सुरेल परंपरा पुढे नेत आहे. सोमवार 22 सप्टेंबरपासून देशभरातील दिग्गज कलावंतांच्या उपस्थितीत हा महोत्सव सुरु होणार असून, तब्बल नऊ दिवस संगीत रसिकांसाठी अविस्मरणीय ठरणार आहेत.

महोत्सवाचे उद्घाटन ख्यातनाम शास्त्रीय गायिका विदुषी कलापिनी कोमकली यांच्या हस्ते होणार असून, आमदार डॉ. सुरेश खाडे अध्यक्षस्थानी असतील. आमदार सुधीर गाडगीळ व जनसुराज्यचे प्रदेशाध्यक्ष समित कदम प्रमुख उपस्थितीत राहणार आहेत. उद्घाटनानंतर कोमकली यांच्या शास्त्रीय गायनाने या महोत्सवाची सुरुवात होणार आहे.

संगीताची मेजवानी – आठवडाभर कार्यक्रमांची रेलचेल

  • 23 सप्टेंबर : प्रसिध्द गायिका प्रियांका बर्वे यांना संगीतकार राम कदम पुरस्काराचा मान. सायंकाळी मराठी गीतांचा विशेष कार्यक्रम.
  • 24 सप्टेंबर : युवा तबलावादक संजीवनी हसबनीस यांना डॉ. अबन मेस्त्री पुरस्कार, त्यानंतर तबला वादन व विदुषी सायली तळवळकर यांचे गायन.
  • 25 सप्टेंबर : सचिन व सोहम जगताप यांची बासरी-संतुर जुगलबंदी, अनिरुध्द ऐठल यांचे शास्त्रीय गायन.
  • 26 सप्टेंबर : दुर्गा शर्मा यांचे व्हायोलिन वादन, आदित्य मोडक यांचे गायन.
  • 27 सप्टेंबर : सुजाता गुरव यांचे शास्त्रीय गायन, पंडित मिलिंद शैरॉय व सुश्मिता डवाळकर यांचे बासरी वादन.
  • 28 सप्टेंबर : शर्वरी वैद्य यांचे गायन, फारुक लतिफ खान यांचे सारंगी वादन, तन्मया क्षीरसागर यांचे गायन.
  • 29 सप्टेंबर : गरीमा-रिध्दिमा यांची सतार जुगलबंदी, दीपिका वरदराजन यांचे गायन.
  • 30 सप्टेंबर : अ‍ॅड. अमित द्रविड, आलापिनी जोशी, श्रेया ताम्हणकर व मीता पंडित यांचे कार्यक्रम. समारोपाला दिशा देसाई यांचे कथ्थक नृत्य.
  • 1 ऑक्टोबर : समारोप सोहळा – आनंदतरंग मराठी मैफल व पंडित ऋषिकेश बोडस यांचे गायन.

संगीत महोत्सव मंडळाने सर्व रसिकांना आवाहन केले आहे की, “मिरजेचा अंबाबाई नवरात्र महोत्सव ही परंपरेची शान आहे. यंदाही दिग्गज कलाकारांच्या माध्यमातून शास्त्रीय संगीताची मैफिल रसिकांच्या मनात घर करेल.”

हेही वाचा: पडळकरांच्या वक्तव्यावर वाळव्यात संतापाचा लोट; इस्लामपुरात निषेध मोर्चा.

Share This Article
Sangli Today Desk ही सांगली टुडे न्यूजची संपादकीय टीम आहे. आमची टीम सांगली जिल्ह्यातील सत्यापित बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवते — सामाजिक कार्यक्रम, शिक्षण, शेती, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था, नागरिक प्रश्न आणि तालुका स्तरावरील घडामोडींवर लक्ष केंद्रित करते. दररोजच्या स्थानिक घटनांचा आढावा घेऊन अचूक व विश्वासार्ह माहिती देणे हेच आमचे ध्येय आहे.