मिरज : दोन वर्षांपूर्वी झालेल्या किरकोळ वादातून मिरज शहरात भरदिवसा एका दुकानाची कोयत्याने तोडफोड केल्याची घटना घडली. या प्रकरणी मिरज शहर पोलिसांनी प्रथमेश तांदळे (वय 28, रा. कमानवेस, मिरज) या सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील कर्मवीर भाऊराव पाटील चौक परिसरात मनोज चव्हाण यांचे ‘मनोज कलेक्शन’ नावाचे दुकान आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी प्रथमेश तांदळे हा दुकानात गॉगल खरेदीसाठी आला होता. त्यावेळी पाचशे रुपयांत दोन गॉगल देण्याची मागणी केल्याने दुकानदार आणि त्याच्यात वाद झाला होता.
याच जुन्या वादातून बुधवारी सायंकाळी प्रथमेश तांदळे हा कोयता घेऊन दुकानात आला. त्याने सुरुवातीला दुकानाबाहेर ठेवलेल्या रॅकवर हल्ला केला आणि त्यानंतर दुकानाच्या काचेवर कोयत्याने वार करून काच फोडली. तसेच दुकानदार मनोज चव्हाण यांना ‘येथे धंदा करू देणार नाही’ अशी धमकी देऊन तेथून पळ काढला.
दरम्यान, ही संपूर्ण घटना दुकानाबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. घटनेची माहिती मिळताच मिरज शहर पोलिसांनी तपास सुरू करून आरोपी प्रथमेश तांदळे याला ताब्यात घेतले. त्याच्या घरावर छापा टाकून हल्ल्यात वापरलेला कोयता जप्त करण्यात आला.
या कारवाईत मिरज शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक किरण चौगले, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक निरीक्षक भैरवनाथ पाटील आणि त्यांच्या पथकाने सहभाग घेतला.
येथे वाचा: Sangli Crime News Today.
हेही वाचा: म्हैसाळ यात्रेत पार्क केलेली मोटारसायकल चोरी; वैरण बाजार परिसरातील प्रकार.
- बंगळुरू-मुंबई स्लीपर वंदे भारतवरून नवा वाद; सांगली-बेळगावला डावलले जाणार?
- सांगलीत युवा पिढीला तंबाखूपासून दूर राहण्याचे आवाहन; 2025-26 या वर्षात एकूण 2361 जणांचे समुपदेशन
- सांगली जिल्ह्यात 16 मेपासून जनगणना 2027 चा पहिला टप्पा सुरू; 4,421 प्रगणक घराघरात जाऊन डिजिटल घरगणना करणार
- कवठेमहांकाळ शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू; 8 वी ते पदवी विद्यार्थ्यांना मोठी संधी
- बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी ₹149 कोटींच्या आराखड्यास मंजुरी
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक










