Miraj News Today : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मिरज एज्युकेशन सोसायटीच्या नूतन शैक्षणिक संकुलाचा भूमिपूजन सोहळा संपन्न
मिरज : मिरज एज्युकेशन सोसायटीच्या नूतन शैक्षणिक संकुलाच्या बांधकामाचा शुभारंभ उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कार्यमंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळ्याद्वारे संपन्न झाला. या सोहळ्याला मोठ्या संख्येने मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.
नव्या संकुलाचे बांधकाम हे केवळ भौतिक इमारत नसून विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी एक मजबूत पायाभरणी ठरणार असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक सुविधा, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उज्ज्वल भविष्याची संधी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी मिरज विधानसभा आमदार व माजी मंत्री सुरेशभाऊ खाडे, सांगलीचे आमदार सुधीर दादा गाडगीळ, भाजपा पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, भाजपा जैन प्रकोष्ठ प्रदेश उपाध्यक्ष रावसाहेब पाटील, सोसायटीचे अध्यक्ष संजय धामणगांवकर, कार्याध्यक्ष चंद्रकांत देशपांडे, कार्यवाहक कविताताई चौथाई यांच्यासह शिक्षक वर्ग, विद्यार्थी, आर्किटेक्ट आणि कॉन्ट्रॅक्टर उपस्थित होते.
हेही वाचा: कृष्णा–वारणा नदी प्रदूषणावर कारवाई; ४३.१८ कोटी दंड.