सांगली : मिरज शहरातील म्हैसाळ रेल्वे उड्डाण पुलाजवळ गांजाची तस्करी करणाऱ्या हद्दपार गुन्हेगारासह दोघांना पोलिसांनी अटक केली. या कारवाईत सात किलो १७५ ग्रॅम गांजा आणि दुचाकीसह सुमारे ३ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये हुसेन बादशाह सय्यद (वय २७) आणि सोहेल लालूखान पठाण (वय २०, दोघे रा. कैकाडी गल्ली, मिरज) यांचा समावेश आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, हुसेन सय्यद हा गंभीर गुन्ह्यांमुळे यापूर्वीच सांगली जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आला होता.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. मिरज परिसरात गस्त घालत असताना दुचाकीवरून संशयास्पद हालचाल करत असलेले दोघे पथकाच्या निदर्शनास आले. त्यानंतर तातडीने छापा टाकून त्यांना ताब्यात घेण्यात आले. झडतीदरम्यान गांजा आणि दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
हद्दपार आदेश असतानाही संबंधित आरोपी मिरज शहरात कसा दाखल झाला, तसेच त्याने तस्करीचा प्रकार कसा सुरू ठेवला, याबाबत पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणी पुढील तपास केला जात असून, तस्करीच्या साखळीतील इतर व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे.
हेही वाचा: सांगली–मिरज–कुपवाडच्या विकासाचा ‘रोलिंग प्लॅन’; रस्ते, भूसंपादन व नवीन उद्यानांबाबत आयुक्तांचे निर्देश.
- तासगाव फाट्याजवळ टेम्पोने अचानक वळण घेतल्याने अपघात; आयशर टेम्पोखाली सापडून दुचाकीस्वार गंभीर जखमी
- सांगली पेठभाग भाजी मंडईतील ₹20.50 लाखांचा काँक्रिट रस्ता 6 महिन्यांत पूर्ण होणार का? नागरिकांचे लक्ष
- सांगली पोलीस भरती 2024-25; 737 उमेदवार लेखी परीक्षेस पात्र, अधिकृत यादी जाहीर
- गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील हिप्परकर टोळी तडिपार; सांगली-सोलापूर जिल्ह्यात प्रवेशबंदी
- भिलवडीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; वाहनचालक फरार
- एनओसीवरून वाद पेटला; सांगलीत वकिलाच्या घरात घुसून धमकी, चौघांवर गुन्हा









