Miraj Politics Update: मिरजेत राजकीय भूकंप! माजी महापौर किशोर जामदार अजित पवार गटात प्रवेशाच्या तयारीत

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
Miraj Kishor Jamdar Joins Ajit Pawar Ncp Politics Update | प्रातिनिधिक छायाचित्र | राजकीय संदर्भासाठी तयार केलेले संपादित दृश्य

Sangli News | मिरज : आगामी सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरजेत राजकीय हालचालींना वेग आला असून, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी महापौर किशोर जामदार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) प्रवेशामुळे राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. जामदार यांचा पक्षप्रवेश आता जवळपास निश्चित मानला जात असून, शुक्रवार, १९ डिसेंबर रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मिरजेत होणाऱ्या मेळाव्यात अधिकृत प्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मिरजेत झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत जामदार यांच्या प्रवेशाचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून मिरज शहरात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपमधील आजी-माजी नगरसेवकांच्या हालचाली वाढल्या होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुकीत ‘मैत्रीपूर्ण लढती’चे संकेत दिल्यानंतर राजकीय हालचालींना अधिक गती मिळाली.

याच पार्श्वभूमीवर किशोर जामदार यांनी अलीकडेच पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. महायुती सत्तेत असल्याने शहराच्या विकासासाठी योग्य राजकीय भूमिका घेणे आवश्यक असल्याचे मत जामदार समर्थकांनी बैठकीत मांडले. या निर्णयामागे मिरज शहरातील विकासकामांना गती देण्याचा मुद्दा महत्त्वाचा असल्याचे सांगण्यात येत आहे.

जामदार यांच्या प्रवेशामुळे मिरजेत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ची संघटनात्मक ताकद वाढणार असून, आगामी महापालिका निवडणुकीत किशोर जामदार ‘किंगमेकर’ची भूमिका बजावू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. या प्रवेशानंतर मिरजेतील राजकीय समीकरणे पुन्हा नव्याने आखली जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: सांगलीतील महिलांसाठी ‘उद्योगिनी’ सुवर्णसंधी; मिळत आहे 3 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज.

TAGGED:
Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा