मिरज : शिवजयंतीनिमित्त मिरज येथील बालगंधर्व नाट्यमंदिरात काल (18 फेब्रुवारी) ला इतिहास आणि लोकसंस्कृतीचा दिमाखदार जागर रंगला. पोवाडे, मर्दानी खेळ, पारंपरिक नृत्य आणि ढोल-ताशांच्या निनादात शिवचरित्र सादर करण्यात आले.
राष्ट्रपती पदक विजेते शाहीर बजरंग आंबी, अनंतकुमार साळुंखे आणि रामचंद्र जाधव यांच्या जोशपूर्ण पोवाड्यांनी सभागृह दुमदुमले. रणशिंगाच्या नादात शिवचरित्रातील पराक्रम उलगडताना प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
सुमित डान्स अकॅडमीच्या कलाकारांनी मर्दानी खेळ आणि युद्धकलेची प्रात्यक्षिके सादर करत कार्यक्रमाला एक वेगळाच रंग दिला.
दरम्यान, बालगंधर्व नाट्यमंदिरात आज (19 फेब्रुवारी) रोजी सायंकाळी 5 ते 8 या वेळेत शिवचरित्रावर आधारित ‘श्रीमंतयोगी’ हे महानाट्य सादर होणार असून या महानाट्यासाठी सर्वांसाठी प्रवेश मोफत आहे.
वाचायला विसरू नका: चंद्र मोहिमेत सांगलीचा सहभाग; ‘या’ जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची नावे ‘नासा’च्या आर्टेमिस-2 मोहिमेत.
- जतचा दुष्काळ लवकरच संपणार? 65 गावांना पाणी, 26,500 हेक्टर सिंचनाचा मार्ग मोकळा
- राज्यात 2000 नवीन ग्रंथालयांना मान्यता; सांगलीतील ग्रंथोत्सवात पालकमंत्र्यांची घोषणा
- आटपाडीत दुकानफोडी; दिघंचीतील इलेक्ट्रिकल दुकान फोडून 70 हजारांचा माल लंपास
- तासगाव फाट्याजवळ टेम्पोने अचानक वळण घेतल्याने अपघात; आयशर टेम्पोखाली सापडून दुचाकीस्वार गंभीर जखमी
- सांगली पेठभाग भाजी मंडईतील ₹20.50 लाखांचा काँक्रिट रस्ता 6 महिन्यांत पूर्ण होणार का? नागरिकांचे लक्ष
- सांगली पोलीस भरती 2024-25; 737 उमेदवार लेखी परीक्षेस पात्र, अधिकृत यादी जाहीर









