Miraj | Sangli – दसरा आणि दिवाळी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांच्या सोयीसाठी केंद्र सरकारने मिरजमधून चार विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
या विशेष गाड्यांची माहिती पुढीलप्रमाणे :
कोल्हापूर – कटिहार (0405) : 14 सप्टेंबरपासून, रविवारी सकाळी 10:20
कोल्हापूर – कलबुर्गी (0209) : 24 सप्टेंबरपासून, रोज सकाळी 07:50
कोल्हापूर – मुंबई (0418) : 24 सप्टेंबरपासून, बुधवारी रात्री 11:10
बंगळुरू – मुंबई (01014) : 25 सप्टेंबरपासून, सायंकाळी 05:35
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे दसरा व दिवाळीच्या काळात प्रवाशांची गर्दी कमी होऊन प्रवास सुलभ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा: आरेवाडी येथे 28 सप्टेंबरला हिंदू बहुजनांचा दसरा मेळावा.