मिरज : शहरातील इंदिरानगर व म्हाडा कॉलनी परिसरात पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम होणार असून दोन दिवस पाणी पूर्णपणे बंद राहणार आहे.
महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून मालगाव रस्ता परिसरातील पाण्याच्या टाकीला गळती लागल्याने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच टाकीची स्वच्छताही केली जाणार आहे.
या कामामुळे मंगळवार (24 मार्च) आणि बुधवार (25 मार्च) रोजी या भागातील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. सोमवार (23 मार्च) रोजी सकाळी नेहमीप्रमाणे पाणीपुरवठा होईल, त्यानंतर दुपारपासून दुरुस्तीचे काम सुरू होणार आहे.
दरम्यान, नागरिकांनी आवश्यक तेवढे पाणी साठवून ठेवावे आणि पाणी जपून वापरावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा: मिरजेत पैशांच्या वादातून कोयत्याने मारहाण; पती-पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल.
- मिरजमधील ‘या’ भागांत दोन दिवस पाणीपुरवठा बंद
- मिरजेत पैशांच्या वादातून कोयत्याने मारहाण; पती-पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल
- सांगलीत रमजान ईद उत्साहात; ईदगाहवर नमाज, हिंदू-मुस्लिम एकोप्याचे दर्शन
- सांगलीत सासू-सुनेत हाणामारी; स्वयंपाकघर झाडण्यावरून वाद, दोघी जखमी
- सांगलीत विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी; परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, खर्च सरकार करणार
- सांगलीतील ‘या’ भागांत शनिवारी पाणी येणार नाही? मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती सुरू










