Sangli News : ७ फेब्रुवारीला भरपगारी सुट्टी; न मिळाल्यास येथे नोंदवता येणार तक्रार

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
७ फेब्रुवारीला मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी | फोटो : प्रतिनिधिक छायाचित्र

सांगली : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी येत्या ७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी सर्व आस्थापना, कारखाने व दुकानदारांनी कामगार, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी द्यावी, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त मु. अ. मुजावर यांनी केले आहे.

खाजगी कंपन्या, औद्योगिक व व्यापारी आस्थापना, दुकाने, निवासी हॉटेल्स, खाद्यगृहे, नाट्यगृहे, माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग मॉल्स तसेच अन्य सर्व आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानासाठी सुट्टी देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

अपवादात्मक परिस्थितीत संपूर्ण दिवसाची सुट्टी देणे शक्य नसेल, तर संबंधित कर्मचाऱ्यांना किमान दोन ते तीन तासांची सवलत देण्यात यावी. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी आवश्यक वेळ मिळेल, याची दक्षता आस्थापना मालक व व्यवस्थापनांनी घ्यावी, असेही सांगण्यात आले आहे.

उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या कार्यक्षेत्रातील सर्व आस्थापनांनी या सूचनांचे काटेकोर पालन करावे. मतदानासाठी आवश्यक सुट्टी अथवा सवलत न दिल्यामुळे मतदान करता न आल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित आस्थापनांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे.

दरम्यान, निवडणुकीच्या दिवशी मतदानासाठी भरपगारी सुट्टी किंवा सवलत न दिल्यास मतदारांनी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय, उद्योग भवन, विश्रामबाग, सांगली येथे तक्रार दाखल करावी. यासाठी दूरध्वनी क्रमांक 0233-2950119 किंवा ई-मेल aclsangli@gmail.com वर संपर्क साधता येईल.

हेही वाचा: ट्रॅक्टर सबसिडीच्या आमिषाने मिरजेत सात शेतकऱ्यांची फसवणूक; ३५ लाखांचा गंडा, एकावर गुन्हा दाखल.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा