Sangli News : ४० लाखांच्या आर्थिक व्यवहाराच्या आरोपांवर संगीतकार पलाश मुच्छलची प्रतिक्रिया; आरोप बदनामीसाठी असल्याचे स्पष्टीकरण

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
४० लाखांच्या आर्थिक व्यवहाराच्या आरोपांवर संगीतकार पलाश मुच्छल यांनी आपली भूमिका स्पष्ट केली | फोटो : संकलन – Sangli Today

सांगली : आर्थिक व्यवहारातील फसवणुकीच्या आरोपाप्रकरणी सांगलीतील तरुणाने दाखल केलेल्या तक्रारीवर प्रसिद्ध संगीतकार पलाश मुच्छल याने आपली बाजू मांडत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. संबंधित दावे निराधार व तथ्यहीन असल्याचा दावा त्याने केला आहे.

सांगली येथील विज्ञान माने यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात पलाश मुच्छल विरोधात लेखी तक्रार दाखल करत ‘नजरिया’ या चित्रपटाशी संबंधित आर्थिक व्यवहारात सुमारे ४० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप केला होता. या तक्रारीवर अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.

दरम्यान, सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना पलाश मुच्छल याने सांगलीतील तक्रारदाराकडून करण्यात आलेले सर्व आरोप चुकीचे असून बदनामी करण्याच्या उद्देशाने हे दावे करण्यात आल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी पलाशची कायदेशीर टीम सर्व पर्यायांचा विचार करत असल्याचेही त्याने स्पष्ट केले आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या ही तक्रार प्राथमिक स्वरूपाची असून दोन्ही बाजूंची माहिती घेऊन चौकशी करण्यात येणार आहे. चौकशीनंतरच पुढील कायदेशीर कारवाईबाबत निर्णय घेतला जाईल.

नेमक काय घडलेल इथे वाचा : संगीतकार पलाश मुच्छलविरोधात सांगली पोलीस अधीक्षकांकडे तक्रार.

हेही वाचा: सांगली–मिरज–कुपवाड महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी शिंदे गटाची भूमिका ठरणार निर्णायक.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा