सांगली : सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणूक निकालानंतर सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. भाजप ३९ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सांगलीत भाजपला मित्रपक्षांच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापन करावी लागणार आहे.
महापालिकेत बहुमतासाठी भाजपला केवळ एका जागेची आवश्यकता असून, यामुळे आता शिवसेना (शिंदे गट) कडील दोन नगरसेवकांचा पाठिंबा अत्यंत निर्णायक ठरणार आहे. या दोन नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिल्यास भाजपचा महापौरपदाचा मार्ग मोकळा होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या संदर्भातील अंतिम निर्णय मुंबईतील महायुतीच्या पातळीवर होणार आहे. त्यामुळे आता राज्यस्तरीय हालचालींवर सांगलीतील सत्ता समीकरण अवलंबून राहणार आहे.
स्थायी समितीतील संख्याबळ
सध्याच्या संख्याबळानुसार स्थायी समितीत भाजपला ८ जागा, काँग्रेसला ४, राष्ट्रवादी (अजित पवार गट) ला ३, तर राष्ट्रवादी (शरद पवार गट) ला १ जागा मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे संख्याबळ अपुरे असल्याने स्थायी समितीत त्यांना प्रतिनिधित्व मिळणार नाही.
त्यामुळेच शिवसेना महापालिकेत इतर महत्त्वाच्या कोणत्या पदांची मागणी करते का, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, महायुतीतील घटक पक्षांमध्ये समन्वय साधण्याबाबत चर्चा सुरू असून, विशेषतः राष्ट्रवादी (अजित पवार गट) महायुतीत सहभागी होणार का, याबाबत स्थानिक पातळीवर मतभेद असल्याचेही संकेत मिळत आहेत.
महापालिकेतील सत्ता नेमकी कुणाच्या हाती जाणार, याबाबतचा निर्णय येत्या काही दिवसांत स्पष्ट होण्याची शक्यता असून, सांगली–मिरज–कुपवाडच्या राजकारणात सध्या अनिश्चिततेची स्थिती कायम आहे.
हेही वाचा: सावळी–तानंग रस्त्यावर भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










