पलूस : शेतातील पाचट जाळताना शेजारच्या उसाला लागलेली आग आटोक्यात आणण्याच्या प्रयत्नात ८५ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना विठ्ठलवाडी (ता. पलूस) येथे घडली. गणपती सदाशिव भोसले असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास गणपती भोसले हे आपल्या शेतात गेले होते. उसाची तोड झाल्यानंतर उरलेले पाचट जाळण्याचे काम ते करत होते. यावेळी अचानक आगीच्या ठिणग्यांमुळे शेजारच्या शेतातील उसालाही आग लागली.
ही आग वाढू नये म्हणून भोसले यांनी ती आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाऱ्याचा वेग आणि आगीच्या तीव्र ज्वालांमुळे काही क्षणातच आग भडकली. आगीने चारही बाजूंनी वेढल्याने भोसले यांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. या दुर्घटनेत ते गंभीररीत्या होरपळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच विठ्ठलवाडी, आमणापूर व पलूस परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत भोसले यांचा मृत्यू झाला होता.
पलूस पोलिस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा: नागपूरच्या पशुखाद्य कंपनीची ८१.४६ लाखांची फसवणूक; सांगलीतील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल.
- इराण-इस्रायल तणावामुळे तेल दर वाढणार? सांगलीत पेट्रोल 104.07 रुपये; सध्या दरवाढ नाही
- विटा-कराड मार्गावर भीषण अपघात; जखमी महिलेचा 10 दिवसांनी मृत्यू
- सांगली महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीची निवड 13 मार्चला; इच्छुकांकडून मोर्चेबांधणी
- सांगलीत कृष्णा नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर; ‘हजारो मासे मृत, 5 लाख नागरिकांच्या आरोग्यास धोका’
- कवठेमहांकाळमध्ये 2.88 किलो गांजा जप्त; तस्कर अटकेत
- सांगलीत ‘आमदार केसरी 2026’ भव्य बैलगाडी शर्यत; विजेत्यास 1 लाखांचे बक्षीस









