सांगली : सांगली शहरात अवघ्या ३० रुपयांच्या माव्यावरून झालेल्या वादातून एका तरुणाचा चाकूहल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. उपचार सुरू असताना सोमवारी सकाळी तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी तिघांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
मृत तरुणाचे नाव नारायण सुरेश पवार (वय २८, रा. वडर गल्ली, सांगली) असे आहे. रविवारी शहरातील एका पानटपरीवर मावा देण्याच्या कारणावरून नारायण पवार याचा काही तरुणांशी वाद झाला होता. या वादातून संशयितांनी त्याच्यावर चाकूने हल्ला केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
हल्ल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या नारायण पवार याला तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान रुग्णालय परिसरात मोठी गर्दी झाली होती. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला होता.
दरम्यान, अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना सोमवारी सकाळी नारायण पवार याचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर पोलिसांनी गुन्ह्याचे स्वरूप बदलून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील संशयित हे परस्पर नातलग असल्याची माहितीही पोलिसांकडून देण्यात आली आहे.
- तासगाव फाट्याजवळ टेम्पोने अचानक वळण घेतल्याने अपघात; आयशर टेम्पोखाली सापडून दुचाकीस्वार गंभीर जखमी
- सांगली पेठभाग भाजी मंडईतील ₹20.50 लाखांचा काँक्रिट रस्ता 6 महिन्यांत पूर्ण होणार का? नागरिकांचे लक्ष
- सांगली पोलीस भरती 2024-25; 737 उमेदवार लेखी परीक्षेस पात्र, अधिकृत यादी जाहीर
- गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील हिप्परकर टोळी तडिपार; सांगली-सोलापूर जिल्ह्यात प्रवेशबंदी
- भिलवडीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; वाहनचालक फरार
- एनओसीवरून वाद पेटला; सांगलीत वकिलाच्या घरात घुसून धमकी, चौघांवर गुन्हा









