सांगली : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय ‘कौस्तुभ पुरस्कार’ यंदा निरंकारी संत समागमच्या सद्गुरु माता सुदिक्षा यांना प्रदान करण्यात आला. सांगली येथे मंगळवारी (दि. 27 जानेवारी 2026) रोजी झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला.
अध्यात्म, सामाजिक समरसता तसेच मानवी मूल्यांचा प्रसार करण्यासाठी सद्गुरु माता सुदिक्षा यांनी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. समाजात शांतता, सहअस्तित्व आणि सद्भावना निर्माण करण्यासाठी त्यांच्या कार्याचा मोठा प्रभाव असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यास महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे संघटक संजय भोकरे, सोशल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे, भाजप नेत्या निताताई केळकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. पुरस्कार सोहळ्यादरम्यान उपस्थित मान्यवरांनी सद्गुरु माता सुदिक्षा यांच्या सामाजिक व अध्यात्मिक कार्याचे कौतुक केले.
हेही वाचा: ३० रुपयांच्या माव्यावरून वाद; सांगलीत तरुणाचा चाकूहल्ल्यात मृत्यू, तिघांविरोधात गुन्हा दाखल.
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी
- सांगलीत डॉ. बाबासाहेबांचे जगातील सर्वात मोठे, पहिले रियलॅस्टिक मल्टी-कलर स्ट्रिंग आर्ट
- जतजवळ ट्रेलरची दुचाकीला धडक; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू
- सांगलीतील 152 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना बदलणार? 13 एप्रिलपर्यंत हरकती नोंदवता येणार
- जत : उमदीजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत कार चालकाचा मृत्यू, सहा जखमी
- सांगलीची रोजगार योजनेत मोठी झेप; 1375 जणांना व्यवसायासाठी कर्ज मंजुरी










