सांगली : आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या संभाव्य युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील काही नागरिक त्या देशांमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनानंतर मिळालेल्या माहितीनुसार सांगली जिल्ह्यातील 44 नागरिक आखाती देशांमध्ये वास्तव्यास असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत माहिती मिळवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. नागरिकांचे नातेवाईक किंवा परिचित आखाती तसेच पश्चिम आशियाई देशांमध्ये राहत असतील आणि त्यांच्या सुरक्षिततेबाबत माहिती हवी असल्यास जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले होते.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत स्थानिक नागरिकांकडून माहिती मिळाल्यानंतर संबंधित तपशील महाराष्ट्र शासनाच्या मुंबई येथील आपत्कालीन संचालन केंद्राशी (EOC) शेअर करण्यात आला आहे. पुढील माहिती मिळवण्यासाठी प्रशासनाकडून समन्वय सुरू असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, जिल्हा प्रशासनाने मंत्रालय, मुंबई येथील आपत्कालीन संचालन केंद्राशी समन्वय साधला असून संबंधित माहिती भारतीय दूतावासापर्यंत पोहोचविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
नियंत्रण कक्ष संपर्क :
- जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली – 0233-2600500
- सांगली पोलिस नियंत्रण कक्ष – 0233-2672100
- मंत्रालय नियंत्रण कक्ष, मुंबई – 9321587143
आखाती देशांमध्ये नातेवाईक असलेल्या सांगली जिल्ह्यातील नागरिकांनी आवश्यक असल्यास या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
नागरिक प्रश्न बातम्या येथे वाचा : Sangli Public Issue News Today.
हेही वाचा: सांगलीत 9 मार्चपासून दुचाकी वाहनांसाठी नवी मालिका सुरू.
- बंगळुरू-मुंबई स्लीपर वंदे भारतवरून नवा वाद; सांगली-बेळगावला डावलले जाणार?
- सांगलीत युवा पिढीला तंबाखूपासून दूर राहण्याचे आवाहन; 2025-26 या वर्षात एकूण 2361 जणांचे समुपदेशन
- सांगली जिल्ह्यात 16 मेपासून जनगणना 2027 चा पहिला टप्पा सुरू; 4,421 प्रगणक घराघरात जाऊन डिजिटल घरगणना करणार
- कवठेमहांकाळ शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू; 8 वी ते पदवी विद्यार्थ्यांना मोठी संधी
- बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी ₹149 कोटींच्या आराखड्यास मंजुरी
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक










