रुग्णवाहिकेला अडथळा तर 10 हजारांचा दंड; सांगलीत वाहनधारकावर कारवाई

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
रुग्णवाहिकेला मार्ग न दिल्यास 10 हजारांचा दंड; सांगलीतील कारवाईचे प्रातिनिधिक छायाचित्र.

सांगली : रुग्णवाहिका किंवा अग्निशामक वाहनांना रस्त्यावरून जाताना अडथळा निर्माण केल्यास थेट 10 हजार रुपयांचा दंड आकारला जाणार असल्याचे स्पष्ट करत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने सांगलीत एका वाहनधारकावर कारवाई केली आहे.

मोटार वाहन कायदा 1988 च्या कलम 194(इ) नुसार आपत्कालीन वाहनांना मोकळा मार्ग न दिल्यास कठोर दंडाची तरतूद आहे. या तरतुदीनुसार MH 04 GP 0628 या वाहनावर 10 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

काय घडले?

29 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री तपासणीदरम्यान मोटार वाहन निरीक्षक आकाश कांबळे यांनी संबंधित वाहन अडवले. वाहनचालकाकडे वैध कागदपत्रे नव्हती. चलन प्रक्रिया सुरू असताना चालकास वाहन निरीक्षकांनी वाहन रस्त्याच्या कडेला घेण्याबाबत सांगूनही चालकाने वाहन रस्त्याच्या मध्यभागीच उभे केल्याने मोठे ट्रॅफिक जॅम झाले.

याच वेळी येणाऱ्या रुग्णवाहिकेला मार्ग मिळाला नाही आणि तिला पर्यायी रस्ता वापरावा लागला. ही बाब गंभीर मानून 12 फेब्रुवारी 2026 रोजी 10 हजार रुपयांच्या दंडाचा आदेश देण्यात आला.

नागरिकांनी काय लक्षात ठेवावे?

रुग्णवाहिका, अग्निशामक बंब, आपत्कालीन वाहने दिसताच तात्काळ बाजूला व्हावे.

रस्त्याच्या मधोमध वाहन उभे करू नये.

नियम मोडल्यास थेट 10 हजार रुपयांचा दंड लागू शकतो.

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी वाहनधारकांना आपत्कालीन वाहनांना मार्ग देण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा: मार्चमध्ये सांगली जिल्ह्यात RTO ची 20+ लायसन्स शिबिरे; तुमच्या तालुक्यात कोणत्या तारखेला?.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा