सांगली : ग्रामीण भागातील नागरिकांना लायसन्ससाठी सांगली RTO कार्यालयात वारंवार फेऱ्या माराव्या लागू नयेत, यासाठी मार्च 2026 महिन्यात तालुकानिहाय शिकाऊ (Learner) व पक्क्या वाहन अनुज्ञप्तीसाठी विशेष शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील विविध तालुक्यांत मार्च महिन्यात एकूण 20 पेक्षा अधिक शिबिरे होणार आहेत.
सांगली जिल्ह्यातील लायसन्स शिबिरांच्या तालुकानिहाय तारखा
- उरूण इस्लामपूर (ईश्वरपूर) – 2 व 16 मार्च
- कोकरूड – 2 मार्च
- विटा – 4, 18 व 28 मार्च
- कडेगाव – 11 व 23 मार्च
- पलूस – 13 व 27 मार्च
- आष्टा – 10 व 30 मार्च
- आटपाडी – 17 मार्च
- जत – 5 व 20 मार्च
- शिराळा – 12 व 25 मार्च
- तासगाव – 9 व 24 मार्च
- कवठेमहांकाळ – 6 मार्च
या शिबिरांमध्ये शिकाऊ परवाना अर्ज, ड्रायव्हिंग चाचणी प्रक्रिया आणि पक्क्या अनुज्ञप्तीशी संबंधित कामे केली जाणार आहेत.
कोणासाठी उपयोगी?
नवीन वाहनचालक, शिकाऊ लायसन्स घेतलेले आणि पक्क्या लायसन्सची प्रतीक्षा असलेले ग्रामीण भागातील अर्जदार.
नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित तालुक्यातील शिबिरात उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा: सांगलीतील कडेपूर ग्रामपंचायतीत 1,355 सेवा ऑनलाइन; AI-ब्लॉकचेन मॉडेलमुळे राज्यात प्रथम क्रमांक.
- सांगलीत युवा पिढीला तंबाखूपासून दूर राहण्याचे आवाहन; 2025-26 या वर्षात एकूण 2361 जणांचे समुपदेशन
- सांगली जिल्ह्यात 16 मेपासून जनगणना 2027 चा पहिला टप्पा सुरू; 4,421 प्रगणक घराघरात जाऊन डिजिटल घरगणना करणार
- कवठेमहांकाळ शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू; 8 वी ते पदवी विद्यार्थ्यांना मोठी संधी
- बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी ₹149 कोटींच्या आराखड्यास मंजुरी
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी










