आटपाडी : आटपाडी शहरातील विठ्ठलनगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी किराणा दुकानाचे शटर उचकटून दुकान फोडल्याची घटना समोर आली आहे. या चोरीत रोख रक्कम आणि किराणा माल असा एकूण 42 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे. या प्रकरणी आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, विठ्ठलनगर येथील प्रतीक सदाशिव जाधव (वय 21) यांचे ‘श्री साई किराणा’ नावाचे दुकान असून, 22 जानेवारी 2026 रोजी रात्री साडेदहा ते 23 जानेवारी रोजी पहाटे साडेपाचच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला.
चोरट्यांनी दुकानातील अंदाजे 10 हजार 500 रुपयांची रोख रक्कम तसेच साखर, शेंगदाणे, खोबरे, साबणाचे दोन बॉक्स आणि सरकी तेलाचे सहा बॉक्स असा सुमारे 8 हजार 400 रुपयांचा किराणा माल चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. एकूण चोरीला गेलेल्या मुद्देमालाची किंमत 42 हजार 600 रुपये इतकी आहे.
सकाळी दुकान उघडण्यासाठी आल्यानंतर चोरी झाल्याचे लक्षात येताच दुकानमालकाने आटपाडी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा: कुपवाडमध्ये सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर 30 हजारांचा दंड; सांगली महापालिकेच्या भरारी पथकाची थेट कारवाई.
- तासगाव फाट्याजवळ टेम्पोने अचानक वळण घेतल्याने अपघात; आयशर टेम्पोखाली सापडून दुचाकीस्वार गंभीर जखमी
- सांगली पेठभाग भाजी मंडईतील ₹20.50 लाखांचा काँक्रिट रस्ता 6 महिन्यांत पूर्ण होणार का? नागरिकांचे लक्ष
- सांगली पोलीस भरती 2024-25; 737 उमेदवार लेखी परीक्षेस पात्र, अधिकृत यादी जाहीर
- गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील हिप्परकर टोळी तडिपार; सांगली-सोलापूर जिल्ह्यात प्रवेशबंदी
- भिलवडीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; वाहनचालक फरार
- एनओसीवरून वाद पेटला; सांगलीत वकिलाच्या घरात घुसून धमकी, चौघांवर गुन्हा









