आटपाडीतील तरुणांचा ‘फुला’ 17 एप्रिलला राज्यभर झळकणार; एका मुरळीच्या पोटी जन्मलेल्या निरागस मुलीची संघर्षकथा

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
जेजुरी येथे वाघ्या-मुरळी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मार्तंड साठे यांच्या हस्ते ‘फुला’ चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण; निर्माते, दिग्दर्शक व कलाकार उपस्थित.

आटपाडी : सांगली जिल्ह्यातील आटपाडी गावातील तरुणांनी तयार केलेला ‘फुला’ हा मराठी चित्रपट 17 एप्रिलपासून महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे. मुरळी परंपरेत जन्मलेल्या एका निरागस मुलीच्या संघर्षाची कथा या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

खंडेरायाच्या साक्षीने जेजुरी येथे वाघ्या-मुरळी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मार्तंड साठे यांच्या हस्ते चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले.

‘फुला’ची निर्मिती अजित शिवाजी जाधव यांनी केली असून दिग्दर्शन अभिषेक जावीर यांचे आहे. पटकथा रवीकिरण जावीर यांनी लिहिली असून संगीत दिग्दर्शन समाधान ऐवळे यांनी केले आहे. ग्रामीण सांस्कृतिक पट, तमाशा फड आणि जागरण-गोंधळ यांसारख्या लोकपरंपरेच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाची कथा उभी राहते.

Phula Movie poster
मुरळी परंपरेतील मुलीच्या संघर्षाची कथा सांगणाऱ्या ‘फुला’ चित्रपटाचे पोस्टर; 17 एप्रिल 2026 रोजी राज्यभर प्रदर्शित.

दिग्दर्शकांच्या मते, हा चित्रपट केवळ एका मुलीची शोकांतिका नसून लोकपरंपरेत अडकलेल्या स्त्री कलाकारांच्या अस्तित्वाचा प्रश्न मांडण्याचा प्रयत्न आहे. मुरळी परंपरेत अनेक स्त्रियांना त्यांची स्वप्नं, हक्क, प्रेम आणि सन्मानाने जगण्याची संधी मिळत नाही. समाज त्यांची कला स्वीकारतो; मात्र त्यांना माणूस म्हणून जगू देतो का, हा प्रश्न चित्रपटातून उपस्थित करण्यात आला आहे.

चित्रपटाच्या निर्मितीत आटपाडीतील स्थानिक कलाकार आणि तंत्रज्ञांचा सहभाग असून हा त्यांचा पहिलाच चित्रपट आहे. त्यामुळे या चित्रपटाबद्दल सांगली जिल्ह्यात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

‘फुला’ 17 एप्रिलपासून राज्यातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा : 24 फेब्रुवारीपासून सांगलीत ‘कृष्णाई मिनी सरस 2026’; ग्रामीण महिलांच्या उत्पादनांचा पाच दिवसीय मेळावा.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा