सांगली : जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉल नूतनीकरणानंतर पुन्हा खेळाडूंसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक खेळाडूंना सरावासाठी पुन्हा सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.
कोविड-19 काळात या हॉलचा वापर वैद्यकीय उपचार केंद्र म्हणून करण्यात आला होता. त्या वेळी करण्यात आलेल्या अंतर्गत बदलांमुळे हॉल खेळासाठी वापरणे शक्य नव्हते, त्यामुळे अनेक खेळाडूंना अडचणींचा सामना करावा लागत होता.
यानंतर शासनाकडून निधी उपलब्ध करून देत हॉलचे नूतनीकरण करण्यात आले. यात वुडन फ्लोअरिंग, दुरुस्ती, रंगकाम तसेच खेळाडूंना आवश्यक सुविधा पुन्हा उभारण्यात आल्या आहेत.
हॉल पुन्हा सुरू झाल्यामुळे आता नियमित सरावासोबतच शालेय व स्थानिक स्तरावरील स्पर्धा घेणे सोपे होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नव्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल अशी अशा व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा: जत: दारूच्या नशेत ऑर्केस्ट्रात गोंधळ; पोलिसांना धक्काबुक्की, 5 जणांवर गुन्हा दाखल.
- सांगलीत बॅडमिंटन हॉल पुन्हा सुरू; खेळाडूंना दिलासा
- जत: दारूच्या नशेत ऑर्केस्ट्रात गोंधळ; पोलिसांना धक्काबुक्की, 5 जणांवर गुन्हा दाखल
- हद्दपार असूनही सांगलीत प्रवेश; राजवाडा चौकात पोलिसांची कारवाई, गुन्हा दाखल
- सांगलीत पेट्रोल-डिझेल, LPG मुबलक? प्रशासनाचा दावा; नागरिकांमध्ये प्रश्नचिन्ह
- सांगलीत अतिक्रमणांवर बुलडोझर; वारणालीत अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त
- शिराळा : सागावजवळ भीषण अपघात; 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू










