सांगली : शहरातील अतिक्रमणांविरोधात महापालिकेने आक्रमक भूमिका घेत वारणाली येथील ZP कॉलनी परिसरात मोठी कारवाई केली. या कारवाईत रस्ते आणि सार्वजनिक जागा अडवणारी अनेक अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली.
महापालिकेच्या पथकाने जेसीबीच्या सहाय्याने ७ कंपाउंड भिंती, २ कुंपण, ४ दुकानांवरील छपरी तसेच एक बांधलेली खोली आणि इमारतीचा वाढीव भाग हटवला. या कारवाईमुळे परिसरातील रस्ते मोकळे करण्यात आले.
अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या उपस्थितीत ही मोहीम राबवण्यात आली. अतिक्रमण विभाग, नगररचना विभाग आणि प्रशासकीय पथकाच्या संयुक्त कारवाईत मोठा सुरक्षा बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.
दरम्यान, आयुक्त सत्यम गांधी यांनी अनधिकृत बांधकामांवर ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाचा इशारा दिला असून, नियम मोडणाऱ्यांवर पुढेही अशीच कठोर कारवाई होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
हेही वाचा: शिराळा : सागावजवळ भीषण अपघात; 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










