सांगली : हद्दपार आदेशाचे उल्लंघन करून सांगलीत प्रवेश केलेल्या इसमास पोलिसांनी राजवाडा चौक परिसरातून ताब्यात घेतले.
प्रशांत दिलीप चौगुले (वय 27, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, सांगली) असे ताब्यात घेतलेल्या इसमाचे नाव आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित इसमाला यापूर्वी सांगली जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले होते. मात्र तो परवानगीशिवाय शहरात आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडले.
राजवाडा चौकातील जुन्या कोर्ट परिसरात ही कारवाई करण्यात आली. संबंधित इसमाने कोणाचीही परवानगी घेतलेली नसल्याचे सांगितले. या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा: सांगलीत पेट्रोल-डिझेल, LPG मुबलक? प्रशासनाचा दावा; नागरिकांमध्ये प्रश्नचिन्ह.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










