जत : तालुक्यातील खैराव येथे ऑर्केस्ट्रा कार्यक्रमादरम्यान दारूच्या नशेत गोंधळ घालणाऱ्या इसमांनी पोलिसांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ऑर्केस्ट्रा कार्यक्रमात काही इसम दारू पिऊन महिला कलाकारांना अश्लील इशारे करत दंगामस्ती करत आहेत अशी तक्रार मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी संबंधित इसमांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांना शिवीगाळ व धक्काबुक्की करण्यात आली. यावेळी इतर काही इसमांनीही पोलिसांच्या कामात अडथळा आणला.
या प्रकरणी गणेश गडदे, नवनाथ करांडे, भारत कर्वे, अनिकेत यजगर व वैभव गडदे यांच्याविरुद्ध जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा: हद्दपार असूनही सांगलीत प्रवेश; राजवाडा चौकात पोलिसांची कारवाई, गुन्हा दाखल.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










