Sangli Politics News | सांगली : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सांगलीत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप जिल्हा ग्रामीण कार्यालयाच्या उद्घाटनावेळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री, पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला.
त्यांनी सांगितले की, महाराष्ट्र संस्कृती बचाव सभेत झालेल्या विक्षिप्त व विकृत भाषणांना उत्तर देण्यासाठी 1 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता सांगलीत भाजपकडून इशारा सभा घेण्यात येणार आहे. या सभेत विरोधकांच्या भाषणांच्या क्लिप दाखवण्यात येतील.
याचबरोबर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्या अर्थमंत्रीपदाच्या काळातील ऑनलाईन लॉटरी घोटाळा, वाशी मार्केट भ्रष्टाचार, ठाण्यातील बिल्डर आत्महत्या, सांगली जिल्हा बँकेतील गैरकारभार व नोकरभरती यांसारख्या मुद्द्यांवर चौकशीची मागणी करणार असल्याचाही इशारा त्यांनी दिला.
चंद्रकांत पाटील म्हणाले, “यापुढे कार्यकर्त्यांनी अंगावर आले की शिंगावर घ्यायचे आहे.” असे वक्तव्य करत त्यांनी भाजप कार्यकर्त्यांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली.
हेही वाचा: आमदार रोहित पाटील यांचा महिन्याचा पगार अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी; तातडीने पंचनामे करून मदत जाहीर करावी.