सांगली : सांगलवाडी येथील चिंचबाग मैदानावर 14 मार्च 2026 रोजी अंध दिव्यांग मुलांचा क्रिकेट सामना आयोजित करण्यात आला आहे. या सामन्याद्वारे दिव्यांग खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आयोजकांकडून करण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी अशोक काकडे, आर्किटेक्ट प्रमोद चौगुले आणि दिलीप शेलवंटे यांच्या हस्ते या सामन्याचे उद्घाटन होणार आहे.
आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, अंध मुलांमधील क्रीडा कौशल्याला संधी मिळावी, त्यांचा आत्मविश्वास वाढावा आणि समाजात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा, या उद्देशाने या सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सांगलवाडीतील चिंचबाग मैदानावर हा सामना होणार आहे. आवाजाच्या आधारे क्षेत्ररक्षण आणि फलंदाजी करणाऱ्या खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी सांगलीकरांना मिळणार आहे.
या उपक्रमासाठी रेड स्वस्तिक, आभाळमाया फाउंडेशन, कौरंग फाउंडेशन, सारथी फाउंडेशन, उत्कर्ष भोजनालय, हॉटेल रहमतुल्ला, NAB आणि स्वरगंधार सांस्कृतिक मंच या संस्थांचे सहकार्य आहे.
दरम्यान, हा सामना 14 मार्च रोजी दुपारी 2.30 वाजता सुरू होणार असून सांगलीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
हेही वाचा: जतमध्ये 27.58 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा दाखल.
- अपघातात मृत्यू झाल्यास शेतकऱ्यांना 2 लाखांची मदत; ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना’
- सांगलीत गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी मोठी कारवाई; ३७ एजन्सींची तपासणी, ३ जणांना अटक
- सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेत समित्यांचे सभापती बिनविरोध; अतुल माने स्थायी समितीचे सभापती
- कडेगाव वांगी हिट अँड रन प्रकरण; जखमी मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू
- 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींना मिळणार 1.01 लाख रुपये; संपूर्ण माहिती जाणून घ्या
- 7/12 दुरुस्ती, दाखले, PM-Kisan व इतर सरकारी योजनांचा लाभ एकाच ठिकाणी; बुधगाव येथे 14 मार्चला विशेष शिबिर









