Sangli Theft : सांगली बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत महिलेचे दीड लाखांचे दागिने व मोबाईलची चोरी

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
प्रातिनिधिक छायाचित्र – Sangli Today

सांगली : सांगलीच्या मध्यवर्ती बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत चोरीचा प्रकार घडल्याची घटना समोर आली आहे. बसमध्ये चढताना एका महिलेच्या पर्समधील दागिने व मोबाईल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याप्रकरणी सांगली शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

याप्रकरणी धनश्री प्रमोद राजमाने (वय २९, रा. मणेराजुरी, ता. तासगाव) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धनश्री राजमाने या २७ डिसेंबर २०२५ रोजी सांगली येथे आल्या होत्या. दुपारी चार ते साडेचारच्या दरम्यान त्या मध्यवर्ती बसस्थानकात पोहोचल्या.

बसमध्ये चढताना झालेल्या गर्दीत अज्ञात व्यक्तीने त्यांच्या पर्समधील दागिने असलेली छोटी पर्स तसेच मोबाईल चोरला. बसमध्ये बसल्यानंतर काही वेळाने पर्सची चेन उघडी दिलसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर चोरी प्रकार उघड झाला.

घटनेनंतर त्यांनी तत्काळ बस वाहकाशी संपर्क साधून बस थांबवण्याची विनंती केली व शोध घेण्यात आला. यानंतर शुक्रवारी सायंकाळी त्यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.

पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, गर्दीच्या ठिकाणी प्रवाशांनी आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत अधिक सावध राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा: डांगे कॉलेजजवळ अपघात; महिलेचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा