Sangli Crime: दिघंचीत जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला; मोटारीने धडक देत कोयत्याने वार

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
Sangli Dighanchi Attempt To Murder Car Hit Attack (प्रातिनिधिक छायाचित्र)

Sangli News | आटपाडी : दिघंची (ता. आटपाडी) येथे जुन्या वादाच्या रागातून एका तरुणाला मोटारीने धडक देऊन तसेच त्याच्यावर कोयत्याने वार करत खुनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी आटपाडी पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न व हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत साहिल सलमान खान (वय 22, व्यवसाय – सेंट्रिंग काम, रा. यमाईनगर, दिघंची) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवार दि. 14 डिसेंबर 2025 रोजी रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास साहिल खान व त्याचा मित्र प्रवीण अंकुश मोरे हे मोटारसायकलवरून दिघंची एसटी स्टँड परिसरातून घरी जात होते.

दिघंची–झरे रस्त्यावरील एका कार्यालयाजवळ पोहोचताच आरोपी नईम अमिर तांबोळी, प्रथमेश अण्णा चव्हाण आणि प्रशांत मोरे (सर्व रा. दिघंची) यांनी संगनमत करून मोटारीतून येत त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. धडकेमुळे साहिल खान रस्त्यावर कोसळला.

यानंतर आरोपी मोटारीतून उतरून साहिल याच्या डोक्यावर आणि उजव्या हातावर कोयत्याने वार करत “तुला जिवंत ठेवणार नाही” अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या हल्ल्यात साहिल खान गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच आटपाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपींविरोधात भारतीय दंड संहिता कलमांनुसार खुनाचा प्रयत्न तसेच भारतीय हत्यार अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा: लग्न लावतो म्हणून पाच लाखांचा गंडा; सुपारी फुटली, नवरी बेपत्ता

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा