Sangli News | मिरज : मिरज–पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर चिरमुऱ्याची पोती वाहून नेणाऱ्या टेम्पोला अचानक आग लागून टेम्पो पूर्णपणे जळून खाक झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. चालकाने प्रसंगावधान राखत वेळेत टेम्पोमधून उडी मारल्याने मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित टेम्पो इचलकरंजी येथे चिरमुऱ्याची पोती पोहोचवून पंढरपूरच्या दिशेने परतत होता. मिरज–पंढरपूर महामार्गावर असताना टेम्पोच्या इंजिन भागातून अचानक धूर निघू लागला. काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले.
आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने तातडीने टेम्पो रस्त्याच्या कडेला थांबवत उडी मारून स्वतःचा जीव वाचवला. मात्र, आगीचा वेग इतका तीव्र होता की टेम्पो काही मिनिटांतच पूर्णपणे जळून खाक झाला.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. या आगीत टेम्पोतील सर्व साहित्य जळून खाक झाले असून मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या घटनेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करत पुढील तपास सुरू केला आहे.
हेही वाचा: दिघंचीत जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला; मोटारीने धडक देत कोयत्याने वार.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










