Sangli DCC Bank Election Result 2026: सांगली जिल्हा बँक निवडणुकीत मोठा राजकीय भूकंप! गोपीचंद पडळकर, संजयकाका पाटील विजयी; सुमनताई पाटील पराभूत

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
सांगली जिल्हा बँक निवडणुकीत पडळकर, संजयकाका पाटील, घोरपडे आणि कोरे विजयी; तासगावमध्ये सुमनताई पाटील यांचा अवघ्या २ मतांनी पराभव. (प्रतिनिधिक छायाचित्र.)

सांगली टुडे वृत्तसेवा: संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (SDCC Bank) संचालक मंडळाच्या निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. आज मंगळवारी (३ नोव्हेंबर) मार्केट यार्डातील शेतकरी भवनात अत्यंत कडेकोट बंदोबस्तात मतमोजणी पार पडली. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या लढतीत भाजप आमदार (Gopichand Padalkar) गोपीचंद पडळकर, माजी खासदार संजयकाका पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे आणि अण्णासाहेब कोरे यांनी विजय मिळवला आहे. तासगावच्या प्रतिष्ठेच्या लढतीत माजी आमदार सुमनताई पाटील यांचा अवघ्या एका मताने निसटता पराभव झाला आहे.

२१ पैकी १५ जागा आधीच बिनविरोध झाल्यामुळे उर्वरित ६ जागांवर रविवारी ९३.९१% विक्रमी मतदान झाले होते. आज झालेल्या मतमोजणीत मतदारांनी कौल दिला आहे.

प्रमुख गटांमधील निकाल आणि मतांची अधिकृत आकडेवारी:

गट (तालुका)विजयी उमेदवारमिळालेली मतेपराभूत उमेदवारमिळालेली मतेफरक / स्थिती
जत सोसायटी गटगोपीचंद पडळकर (भाजप)५४विनोद पवार (काँग्रेस)३४२० मतांनी पडळकर विजयी
तासगाव सोसायटी गटसंजयकाका पाटील (भाजप)३९सुमनताई पाटील (राष्ट्रवादी SP)३८अवघ्या एका मताने संजयकाका विजयी
कवठेमहांकाळ गटअजितराव घोरपडे३७टी. व्ही. पाटील३३४ मतांनी घोरपडे विजयी
मिरज सोसायटी गटआपणापा कोरे४६अनिल शेनगुरसे२२२४ मतांनी कोरे विजयी

हेही वाचा: सोन्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण! PNG आणि चंदुकाका सराफचे आजचे सोन्याचे दर (३ नोव्हेंबर २०२६).

तासगावमध्ये एका मताचा थरार; रोहित पाटलांना धक्का

या निवडणुकीतील सर्वात हायव्होल्टेज सामना तासगाव सोसायटी गटात रंगला होता. येथे माजी खासदार संजयकाका पाटील आणि माजी आमदार सुमनताई पाटील यांच्यात अटीतटीची लढत झाली. आमदार रोहित पाटील यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची होती. मात्र, संजयकाका पाटील यांनी ३९ मते मिळवत सुमनताई पाटील (३८ मते) यांचा अवघ्या एका मताने पराभव केला.

जतमधून गोपीचंद पडळकरांची जिल्हा बँकेत दणदणीत एन्ट्री

मतदानाच्या दिवशी गोपनीयतेच्या मुद्द्यावरून मोठा वाद आणि तणाव निर्माण झालेल्या जत सोसायटी गटात आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी ५४ मते घेत काँग्रेसच्या विनोद पवार (३४ मते) यांचा २० मतांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. या विजयामुळे गोपीचंद पडळकर यांनी प्रथमच सांगली जिल्हा बँकेत अधिकृत प्रवेश मिळवला आहे.

हेही वाचा: बांधकाम कामगारांना १० वस्तूंचा मोफत संच; लाभ कसा मिळवावा? वाचा सविस्तर.

घोरपडे आणि कोरे यांचाही विजय

कवठेमहांकाळमधून माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी ३७ मते मिळवून टी. व्ही. पाटील (३३ मते) यांच्यावर ४ मतांनी निसटता विजय मिळवला. तर मिरज तालुक्यातून अण्णासाहेब कोरे यांनी ४६ मते घेत अनिल शेनगुरसे (२२ मते) यांच्यावर २४ मतांनी एकतर्फी विजय संपादन केला.

या निकालांमुळे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
चॅनेल फॉलो करा