Sangli Election : आज १५ जानेवारी रोजी सांगलीत मतदान सुरू; मागील निवडणुकीतीचा निकाल, मतदान टक्केवारी व आकडेवारीवर एक नजर

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिका फोटो : Sangli Today

सांगली : सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिकेसाठी आज, १५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया सुरू असताना, मागील म्हणजेच २०१८ सालच्या महानगरपालिका निवडणुकीत काय घडले होते, हे जाणून घेण्याची अनेक मतदारांना उत्सुकता आहे.

२०१८ मध्ये सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक १ ऑगस्ट रोजी पार पडली होती. त्या वेळी शहरातील एकूण २० प्रभागांमधून ७८ जागांसाठी निवडणूक घेण्यात आली होती. या निवडणुकीत तब्बल ४५१ उमेदवार रिंगणात होते.

त्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ४१ जागा जिंकत सर्वाधिक जागा मिळवल्या होत्या. काँग्रेस पक्षाला २० जागा मिळाल्या होत्या, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने १५ जागांवर विजय मिळवला होता. उर्वरित जागांवर अपक्ष व इतर उमेदवार निवडून आले होते.

मतदानाच्या टक्केवारीबाबत पाहता, २०१८ मध्ये एकूण ६२.१७ टक्के मतदान झाले होते. त्या वेळी महानगरपालिकेतील एकूण मतदारसंख्या ४ लाख २४ हजार १७९ इतकी होती. यापैकी २ लाख ६३ हजार ७३२ मतदारांनी प्रत्यक्ष मतदानाचा हक्क बजावला होता. पुरुष मतदारांची संख्या २ लाख १५ हजार ५४७, महिला मतदारांची संख्या २ लाख ८ हजार ५९५, तर तृतीयपंथीय मतदारांची संख्या ३७ इतकी होती.

२०१८ च्या निवडणुकीत ७८ पैकी ३९ जागा महिलांसाठी राखीव होत्या. प्रवर्गनिहाय पाहता, ४५ जागा खुल्या प्रवर्गासाठी, ११ जागा अनुसूचित जातींसाठी, १ जागा अनुसूचित जमातीसाठी आणि २१ जागा मागासवर्गीय प्रवर्गासाठी राखीव होत्या.

दरम्यान, आज होत असलेल्या मतदानात सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिकेत एकूण ४ लाख ५४ हजार ४२८ मतदार मतदानासाठी पात्र आहेत. आजच्या मतदानानंतर उद्या, १६ जानेवारी रोजी मतमोजणी होणार असून, उद्या मतदारांनी दिलेला कौला स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा: उत्साहात पार पडल्या सांगली जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा; ZP CEO विशाल नरवाडे यांची प्रमुख उपस्थिती.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा