सांगली : जिल्ह्यात गॅस सिलिंडरचे वितरण अधिक पारदर्शक पद्धतीने व्हावे यासाठी आता घरपोच सिलिंडर देताना ग्राहकांच्या मोबाईलवर आलेला OTP तपासूनच सिलिंडर देण्याच्या सूचना प्रशासनाने गॅस वितरकांना दिल्या आहेत.
जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या बैठकीत सर्व गॅस एजन्सींना सांगितले की, गॅस बुक केल्यानंतर ग्राहकांच्या मोबाईलवर OTP येतो. हा OTP पडताळल्यानंतरच घरपोच सिलिंडर द्यावा. यामुळे सिलिंडर योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचत असल्याची खात्री होणार आहे.
OTP पडताळणीमुळे गॅस वितरणात पारदर्शकता राहण्यास मदत होते. तसेच सिलिंडरचा गैरवापर किंवा चुकीच्या व्यक्तीला वितरण होण्याची शक्यता कमी होते, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, जिल्ह्यात सध्या एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. एचपीसीएलचा 2198 मेट्रिक टन, बीपीसीएलचा 208 मेट्रिक टन आणि आयओसीएलचा 44 मेट्रिक टन असा साठा उपलब्ध आहे.
तसेच आणखी 1096.3 मेट्रिक टन एलपीजी साठा सांगलीत येत असल्याने घरगुती ग्राहकांना गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
- सांगलीत गॅस वितरणात बदल; आता OTP पडताळणीनंतरच मिळणार घरपोच सिलिंडर
- Sangli Travels Bus Fire: सांगलीत पहाटे स्टेडियमसमोर ट्रॅव्हल्स बसला आग; अग्निशमन दलाची तत्परता, तासाभरात आटोक्यात
- म्हैसाळ येथे जनावरांची बेकायदेशीर वाहतूक; टाटा योध्दा गाडीत 5 जनावरे दाटीवाटीने
- नोकरी शोधणाऱ्या महिलांसाठी सुवर्णसंधी; सांगलीत 23 मार्चला 300 पेक्षा जास्त पदांसाठी मुलाखती
- मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सांगलीला निघाले… शिरढोण येथे दुचाकी अपघातात वडिलांचा मृत्यू
- शिराळ्यात मक्याच्या शेतात गांजाची लागवड; एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल









