सांगली : जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी नवी मुंबईतील कळंबोली येथे आयोजित संवाद बैठकीत आटपाडी, जत आणि कवठेमहांकाळ तालुक्यातून रोजगारासाठी मुंबईत आलेल्या माथाडी व कष्टकरी कामगारांशी संवाद साधला.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित या बैठकीत मुंबईत काम करणाऱ्या गावाकडील कष्टकरी बांधवांच्या समस्या, अडचणी आणि अपेक्षा जाणून घेण्यात आल्या. पोटापाण्यासाठी मुंबईत संघर्ष करत असलेल्या कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा करत त्यांच्या अडचणींबाबत माहिती घेण्यात आली.
या बैठकीदरम्यान कष्टकरी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी आणि त्यांच्या प्रश्नांसाठी ठामपणे उभे राहण्याची भूमिका आमदार पडळकर यांनी व्यक्त केल्याची माहिती देण्यात आली आहे.

या संवाद बैठकीस माजी समाजकल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर, आटपाडी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष यू. टी. जाधव, तसेच भाजप व विविध संघटनांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा: राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाने मतदार यादी प्रसिद्धीस मुदत वाढ.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










