Sangli News : खेळाडू व क्रीडा संघटनांसाठी ‘क्रीडा ई-प्रमाण’ प्रणाली लागू; ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर नोंदणी अनिवार्य

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
क्रीडा ई-प्रमाण प्रणालीबाबत जिल्हा क्रीडा कार्यालयाची अधिकृत माहिती | फोटो : संकलन – Sangli Today

सांगली : राज्यातील गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय व निमशासकीय सेवांमधील ५ टक्के क्रीडा आरक्षणाचा लाभ अधिक पारदर्शक, जलद आणि त्रुटीमुक्त पद्धतीने मिळावा, यासाठी शासनाने ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित ‘क्रीडा ई-प्रमाण’ प्रणाली कार्यान्वित केली आहे. या प्रणालीअंतर्गत खेळाडू आणि क्रीडा संघटनांची नोंदणी अनिवार्य करण्यात आल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांनी दिली आहे.

राज्य शासनाच्या क्रीडा धोरणानुसार, यापुढे जुनी कागदपत्रांवर आधारित पडताळणी प्रक्रिया बंद करण्यात येऊन पूर्णतः डिजिटल प्रणाली राबवली जाणार आहे. या नव्या व्यवस्थेमुळे कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) आणि ब्लॉकचेन (Blockchain) तंत्रज्ञानाच्या सहाय्याने माहितीची स्वयंचलित पडताळणी होणार आहे.

या निर्णयानुसार, क्रीडा संघटनांनी स्पर्धा पूर्ण झाल्यानंतर सात दिवसांच्या आत अंतिम निकाल, सहभागी खेळाडूंची यादी व गुणपत्रिका https://sports.maharashtra.gov.in/ या क्रीडा ई-प्रमाण पोर्टलवर अपलोड करणे बंधनकारक राहील. ही माहिती संबंधित संघटनेच्या अधिकृत पदाधिकाऱ्याने डिजिटल स्वाक्षरीने प्रमाणित करणे आवश्यक आहे. ठराविक कालावधीत माहिती अपलोड न केल्यास, त्यामुळे खेळाडूंचे नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित संघटनेची राहणार आहे.

खेळाडूंनी देखील क्रीडा ई-प्रमाण पोर्टलवर आधार संलग्न आयडीद्वारे लॉग-इन करून नोंदणी करणे अनिवार्य आहे. खेळाडूंच्या नोंदी आणि संघटनांकडून अपलोड केलेल्या अभिलेखांची प्रणालीद्वारे स्वयंचलित पडताळणी होणार असल्याने, यापुढे प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही.

तांत्रिक कारणांमुळे एखाद्या खेळाडूचे प्रमाणपत्र नामंजूर झाल्यास, ऑनलाईन तक्रार व अपील करण्याची सुविधा उपलब्ध असून, ३० दिवसांच्या आत अपील करता येणार असून, अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा: द्राक्ष व बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा; खासदार विशाल पाटील सहभागी.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा