Sangli Mahanagarpalika Election Reservation 2025 | सांगली : सांगली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण प्रक्रियेचा अंतिम टप्पा सुरू असून 2018 प्रमाणेच अनुसूचित जाती-जमातींसाठीचे आरक्षण कायम राहणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महापालिकेतील 11 जागा अनुसूचित जातीसाठी तर 1 जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. याशिवाय प्रत्येक प्रभागात ओबीसीसाठी एक जागा आरक्षित केली जाणार असून महिलांसाठी नव्याने चिठ्ठ्या काढल्या जाणार आहेत.
आरक्षणाची ही रूपरेषा 2011 च्या जनगणनेनुसार निश्चित केली जात आहे. मागील निवडणुकीप्रमाणेच उतरत्या क्रमाने प्रभागांचे आरक्षण होईल, मात्र महिला आणि पुरुषांच्या जागांमध्ये फेरबदल होणार आहे.
राज्य शासनाने 20 ऑगस्ट 2025 रोजी जारी केलेल्या नव्या नियमावलीनुसार ही प्रक्रिया राबविण्यात येत असून प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर 10 दिवसांत आरक्षणाची सोडत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा: काँग्रेस शहराध्यक्षपदाचा तिढा वाढला; सात दावेदार शर्यतीत, बंडखोरीची चिन्हे.