Sangli Mayor Reservation 2026 : सांगली महापौरपद कुणाकडे जाणार? आरक्षण जाहीर

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
सांगली-मिरज-कुपवाड महापालिका महापौर पद खुल्या (सर्वसाधारण) प्रवर्गात निश्चित | फोटो : संकलन – Sangli Today

सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेचे पुढील अडीच वर्षांसाठी महापौरपद कुणाकडे जाणार, याबाबत राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता होती. ही उत्सुकता आता संपली असून, राज्यातील महापौर पदांच्या आरक्षण सोडतीत सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेचे महापौरपद खुल्या (सर्वसाधारण) प्रवर्गासाठी निश्चित झाले आहे.

राज्यातील २९ महानगरपालिकांमधील महापौर पदांची आरक्षण सोडत नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सोडतीनुसार पुढील अडीच वर्षांच्या कालावधीसाठी विविध प्रवर्गांतील आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.

या सोडतीत राज्यातील २९ महापालिकांपैकी १५ महापालिकांमध्ये महिलांसाठी आरक्षण लागू झाले असून, उर्वरित महापालिकांमध्ये अनुसूचित जाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग तसेच सर्वसाधारण प्रवर्गासाठी महापौरपदे निश्चित करण्यात आली आहेत. सांगली-मिरज-कुपवाड महापालिका ही सर्वसाधारण प्रवर्गात समाविष्ट आहे.

महापौर पदाचे आरक्षण स्पष्ट झाल्यानंतर आता स्थानिक राजकीय पक्षांमध्ये पुढील रणनीती, सत्ता समीकरणे आणि उमेदवार निश्चितीबाबत हालचालींना अधिक वेग येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: मिरजेत गुरू तेग बहादुर साहिब यांच्या ३५० व्या शहीदी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा