मिरज : शीख समाजाचे नववे गुरू हिंद-दी-चादर श्री गुरू तेग बहादुर साहिब यांच्या ३५० व्या शहीदी वर्षानिमित्त मिरज येथील १२५ वी जयंती मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात गुरू तेग बहादुर साहिब यांच्या त्याग, मानवतावादी विचार आणि धार्मिक स्वातंत्र्यासाठी दिलेल्या बलिदानावर प्रकाश टाकण्यात आला.
या वेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले क्षेत्रीय समितीचे सदस्य सरदार भूपेंद्र सिंग यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, गुरू तेग बहादुर साहिब यांनी धर्मांतराला विरोध करत मानवता आणि धार्मिक स्वातंत्र्यासाठी आपले प्राण अर्पण केले. मानवता हाच त्यांचा खरा धर्म होता आणि त्यांचे विचार आजही समाजासाठी प्रेरणादायी आहेत, असे ते म्हणाले.
हा कार्यक्रम जिल्हाधिकारी अशोक काकडे आणि उपसंचालक (माहिती) प्रवीण टाके यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय माहिती कार्यालय कोल्हापूर, जिल्हा माहिती कार्यालय सांगली, जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी कार्यालय आणि सामाजिक न्याय विभाग सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमास जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी तथा जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर, शासकीय वसतिगृहाचे गृहपाल पी. बी. शिंदे, ग्रंथी भाई जीवन सिंग, सरदार मनमोहन सिंग यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी गुरू तेग बहादुर साहिब यांना हिंद-दी-चादर ही उपाधी त्यांच्या महान त्यागामुळेच प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले. शहीदी वर्षाच्या निमित्ताने त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश असल्याचे वक्त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी कोठावळे यांनी केले, तर आभार गृहपाल पी. बी. शिंदे यांनी मानले. कार्यक्रमास वसतिगृहातील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
हेही वाचा: सांगली जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणूक 2026 साठी प्रचार जाहिरातींवर नवीन नियम लागू.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










