‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी दुमदुमली सांगली; जिल्हा परिषद ते मारुती चौक ‘मेगा पदयात्रा’

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
जिल्हा परिषद ते मारुती चौक मार्गावर काढण्यात आलेल्या ‘मेगा पदयात्रे’त विद्यार्थी, अधिकारी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग. | छायाचित्र : जिल्हा माहिती कार्यालय, सांगली

सांगली : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त दि. 19 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद ते मारुती चौक दरम्यान ‘मेगा पदयात्रा’ काढण्यात आली. “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांमुळे प्रमुख मार्गांवर जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले.

जिल्हा परिषद येथील शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पदयात्रेला सुरुवात झाली. राम मंदिर चौक, स्टेशन चौक आणि राजवाडा चौक मार्गे ही पदयात्रा मारुती चौकापर्यंत पोहोचली. शेवटी मारुती चौकातील अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करून पदयात्रेची सांगता झाली.

विद्यार्थ्यांच्या मर्दानी खेळांचे आकर्षण

पदयात्रेपूर्वी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या तलवारबाजी, लाठी-काठी, मल्लखांब आणि लेझीमच्या सादरीकरणाने उपस्थितांचे लक्ष वेधले. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेले विद्यार्थी आणि ‘बाल शिवबा’–‘बाल जिजाऊ’ साकारणाऱ्या बालकांमुळे वातावरण अधिकच रंगतदार झाले.

Shiv jayanti 2026 Sangli Social Program
शिवजयंतीनिमित्त आयोजित ‘मेगा पदयात्रे’पूर्वी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. | छायाचित्र : जिल्हा माहिती कार्यालय, सांगली

कार्यक्रमास जिल्हाधिकारी अशोक काकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, विविध शाळांमधील विद्यार्थी, आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा: आजपासून रमजानला सुरुवात; सांगलीत मशिदींमध्ये गर्दी, ‘अजवा खजूर’ला मोठी मागणी.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा