सांगली : घरगुती एलपीजी सिलिंडरचे अवैध रिफिलिंग करून व्यावसायिक वापरासाठी वापर होत असल्याच्या संशयावरून जिल्हा पुरवठा विभागाने सांगली व मिरजेत दोन ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत २५ गॅस सिलिंडर, रिफिलिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या तीन मशिनरी आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले.
मिरज रस्त्यावरील विजयनगर परिसरात तसेच सांगली रेल्वे स्टेशनसमोरील एका ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. संबंधित ठिकाणी सुरक्षेची कोणतीही मानके न पाळता अवैधरित्या गॅस रिफिलिंग सुरू असल्याचे प्राथमिक तपासात आढळल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
या प्रकरणी अमोल हांगे, किरण भोसले आणि संजय कोळेकर या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिलिंडर व मशिनरी जप्त करण्यात आली असून या रॅकेटचा विस्तार किती आहे, याचा तपास सुरू आहे.
अवैध रिफिलिंगमुळे स्फोटाचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशा कारवायांवर प्रशासनाने लक्ष ठेवले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
हेही वाचा: कोल्हापूर रस्त्यावर पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या तरुणास अटक; सांगली शहर पोलिसांची कारवाई.
- तासगाव फाट्याजवळ टेम्पोने अचानक वळण घेतल्याने अपघात; आयशर टेम्पोखाली सापडून दुचाकीस्वार गंभीर जखमी
- सांगली पेठभाग भाजी मंडईतील ₹20.50 लाखांचा काँक्रिट रस्ता 6 महिन्यांत पूर्ण होणार का? नागरिकांचे लक्ष
- सांगली पोलीस भरती 2024-25; 737 उमेदवार लेखी परीक्षेस पात्र, अधिकृत यादी जाहीर
- गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील हिप्परकर टोळी तडिपार; सांगली-सोलापूर जिल्ह्यात प्रवेशबंदी
- भिलवडीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; वाहनचालक फरार
- एनओसीवरून वाद पेटला; सांगलीत वकिलाच्या घरात घुसून धमकी, चौघांवर गुन्हा









