सांगली : कोल्हापूर रस्ता परिसरात पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या एका तरुणाला सांगली शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने ताब्यात घेतले. आकाश सचिन शिंदे (वय 23, रा. पन्नास फुटी रस्ता, सांगली) असे संशयिताचे नाव आहे.
पोलिसांना संबंधित तरुण शस्त्रासह परिसरात वावरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने सापळा रचला. आणि तरुणास ताब्यात घेतले, तपासणीदरम्यान त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक काडतूस जप्त करण्यात आले. पिस्तूल आणि एक काडतूसाची अंदाजे किंमत सुमारे ५० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पिस्तूल घेऊन फिरण्यामागील उद्देश काय होता, तसेच ते कुठून आणले, याबाबत सांगली शहर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या कारवाईत गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी सहभागी होते.
हेही वाचा: तृतीयपंथीयांसाठी रोजगाराचा मार्ग खुला? ‘सांगली पॅटर्न’ अंतर्गत विशेष मेळावा.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










