Sangli Civic Fund Issue: ९० कोटींच्या निधीत सांगलीला डावलले? कोल्हापूरसह पाच महापालिकांना लाभ, सांगलीच्या पदरात शून्य

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
Sangli Miraj Kupwad Municipal Corporation Fund Denied | फोटो सौजन्य : सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिका (अधिकृत संकेतस्थळ)

Sangli News | सांगली : राज्य शासनाने महापालिका क्षेत्रातील मूलभूत नागरी सोयीसुविधांसाठी पुणे विभागातील पाच महापालिकांना एकूण ९० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मात्र या यादीत सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेचा समावेश नसल्याने शहराच्या पदरी निराशा पडली आहे.

राज्य सरकारने २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी नागरी सुविधा विकासासाठी ९० कोटी रुपयांची तरतूद केली होती. या निधीपैकी पहिल्या टप्प्यात २२ कोटी ५० लाख रुपये वितरित करण्यास शनिवारी (दि. १३) मंजुरी देण्यात आली. हा निधी पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर आणि इचलकरंजी या महापालिकांना देण्यात येणार आहे.

शासनाच्या निर्णयानुसार हा निधी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात येत असून, तो केवळ नागरी सुविधा कामांसाठीच वापरण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. उर्वरित निधी टप्प्याटप्प्याने वितरित केला जाणार आहे.

सांगली महापालिकेला निधी का नाही?

महत्त्वाचे म्हणजे, नागरी पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता यांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज असतानाही सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेला या योजनेतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासकीय व राजकीय पातळीवर नाराजी व्यक्त केली जात आहे.

महापालिकांना मंजूर व वितरित निधी (पहिला टप्पा)

पुणे महापालिका: मंजूर ४५ कोटी | वितरित ११.२५ कोटी

कोल्हापूर महापालिका: मंजूर ३० कोटी | वितरित ७.५० कोटी

पिंपरी-चिंचवड: मंजूर ५ कोटी | वितरित १.२५ कोटी

सोलापूर: मंजूर ५ कोटी | वितरित १.२५ कोटी

इचलकरंजी: मंजूर ५ कोटी | वितरित १.२५ कोटी

या यादीत सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेचे नाव नसल्याने “निधी वाटपात अन्याय झाला का?” असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा पुढील काळात राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: महापालिका निवडणूक जाहीर होताच सांगलीत राजकीय घडामोडींना वेग; पक्षप्रवेश व जागावाटपावरून हालचाली तीव्र.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा