Palus News | पलूस : पलूस रोडवरील कोयनानगर (झाडोली) परिसरात आज रविवारी सकाळी झालेल्या अपघातात ६५ वर्षीय शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली असून, धडक दिल्यानंतर चारचाकी वाहनाचा चालक घटनास्थळावरून फरार झाला.
बळीराम विष्णु कांबळे (वय ६५, रा. झाडोली, कोयनानगर, ता. पलूस) हे सकाळी पायी जात असताना आंधळीच्या दिशेने भरधाव येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने (क्र. १८ ४२ ख ६९१०) त्यांना जोराची धडक दिली. अपघातानंतर वाहनचालकाने कोणतीही मदत न करता कारसह पलायन केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
या अपघातात बळीराम कांबळे हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाल्याचे समजते.
या प्रकरणी तानाजी बळीराम कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पलूस पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर फरार झालेल्या चालकाचा शोध पोलिसांकडून सुरू असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.
हेही वाचा: महापालिका निवडणूक जाहीर होताच सांगलीत राजकीय घडामोडींना वेग; पक्षप्रवेश व जागावाटपावरून हालचाली तीव्र.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










