Sangli Political News: महायुतीतील जागावाटपावर आज तोडगा? राष्ट्रवादीची 30 तर शिंदेसेनेची 20 जागांची मागणी; आज सांगलीत निर्णायक बैठक

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
Sangli Municipal Corporation Election Mahayuti Jagavatap Meeting Today | फोटो सौजन्य : महायुती (शिवसेना–भाजप–राष्ट्रवादी) | प्रातिनिधिक छायाचित्र

Sangli Municipal Corporation Election | सांगली : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपाचा पेच आज सुटण्याची शक्यता आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि एकनाथ शिंदे यांच्यातील जागावाटपावर अंतिम चर्चा करण्यासाठी आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.

या बैठकीसाठी शिंदेसेना, जनसुराज्य शक्ती पक्ष तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय)च्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर महायुतीतील सर्व पक्षांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन संभाव्य उमेदवारांची प्राथमिक यादी तयार केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिकेत 30 जागांची मागणी केली असून, शिंदेसेनेने 20 जागांवर दावा केला आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानेही पाच जागांची मागणी केल्याचे समजते. त्यामुळे जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला ठरवताना भाजपसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

दरम्यान, भाजपकडे प्रत्येक प्रभागासाठी स्वतःचेच पाच ते सहा इच्छुक असल्याने उमेदवार निश्चितीची प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची ठरत आहे. भाजपचे प्रभागनिहाय सर्वेक्षण सध्या अंतिम टप्प्यात असून, या सर्वेक्षणाच्या अहवालानंतरच उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.

आजच्या बैठकीकडे महायुतीतील सर्व पक्षांचे लक्ष लागले असून, जागावाटपावर एकमत न झाल्यास निवडणूकपूर्व राजकीय ताणतणाव वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

हेही वाचा: महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे नियम धुडकावले; मिरजमधील रुग्णालयांवर कारवाई, एक निलंबित, दुसऱ्याला नोटीस.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा