मिरज : महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत पात्र असलेल्या रुग्णावर उपचार नाकारल्याचा गंभीर प्रकार मिरजमध्ये उघडकीस आला असून, आरोग्य विभागाने एका खाजगी मल्टीस्पेशालिटी रुग्णालयावर कठोर कारवाई केली आहे. संबंधित रुग्णालयाला योजनेतून अनिश्चित कालावधीसाठी निलंबित करण्यात आले असून, याच भागातील दुसऱ्या एका रुग्णालयाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
सांगली–मिरज रस्त्यावर असलेल्या या खासगी रुग्णालयामध्ये हृदयविकारासह ईतर विविध गंभीर आजारांवरील शस्त्रक्रिया केल्या जातात. मात्र, योजनेअंतर्गत पात्र असतानाही एका रुग्णाला हृदयशस्त्रक्रियेस नकार देण्यात आल्याची तक्रार प्रशासनाकडे दाखल झाली होती. या तक्रारीची सखोल चौकशी केल्यानंतर संबंधित रुग्णालयाला स्पष्टीकरण देण्याची संधी देण्यात आली. मात्र, सादर केलेले उत्तर समाधानकारक नसल्याने थेट निलंबनाची कारवाई करण्यात आली.
दरम्यान, याच परिसरातील दुसऱ्या एका खाजगी रुग्णालयाविरोधातही रुग्णांकडून अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. योजनेतील रुग्णांना बाहेरून औषधे खरेदी करण्यास भाग पाडणे, अनामत रक्कम जमा करण्याची सक्ती करणे, तसेच उपचारांबाबत अपुरी माहिती देणे अशा तक्रारींचा यात समावेश आहे. या प्रकरणी संबंधित रुग्णालयाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, त्यांच्या उत्तरानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांपर्यंत पोहोचावा, यासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून आरोग्य विभागाने दिला आहे. योजनेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णालयांविरोधात भविष्यातही कठोर पावले उचलली जातील, असे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
हेही वाचा: लाडकी बहीण योजनेचा हप्ता रखडला; सांगलीतील महिलांमध्ये संभ्रम, KYC पूर्ण न केल्यास पैसे अडकण्याची भीती.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










