सांगली महापालिका निवडणुकीत महायुतीतील जागावाटपावर चर्चा; भाजपचा ईतर पर्यायांचा विचार सुरू

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
फोटो : पत्रकार परिषदेदरम्यानचे दृश्य (प्रातिनिधिक)

सांगली : सांगली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपाबाबत अद्याप अंतिम तोडगा निघालेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्याकडून जागावाटपाबाबत अपेक्षा मांडण्यात आल्याने महायुतीत पुढील रणनीतीबाबत चर्चा सुरू असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, भाजपकडून विविध पर्यायांवर विचार करण्यात येत असून, काही घटक पक्षांना युतीत स्थान देण्याबाबतही चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. जनसुराज्य शक्ती पक्ष आणि रिपब्लिकन पक्ष आदींबाबतही युतीच्या दृष्टीने विचारविनिमय सुरू असल्याचे सांगण्यात येते.

काल झालेल्या भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत प्रत्येक प्रभागाची जबाबदारी स्थानिक नेत्यांवर सोपवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

भाजपकडून उमेदवार यादीबाबत अंतिम निर्णय अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. मात्र येत्या काही दिवसांत या संदर्भात अधिक स्पष्टता येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा: सांगली महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदानास उरले अवघे 23 दिवस; काँग्रेसची भूमिका अद्याप अस्पष्ट.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा