सांगली : सांगली महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदानास अवघे 23 दिवस शिल्लक असताना काँग्रेस पक्षाकडून उमेदवार निवड आणि निवडणूक रणनीतीबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. निवडणूक प्रक्रिया जाहीर झाल्यानंतरही स्थानिक पातळीवर स्पष्ट दिशा न मिळाल्याने पक्षांतर्गत चर्चा सुरू असल्याचे चित्र आहे.
15 जानेवारी रोजी मतदान होणार असून, अधिकृत प्रचार कालावधी 22 दिवसांचा आहे. मात्र या कालावधीत उमेदवार कधी निश्चित होतील आणि महाविकास आघाडीची एकत्रित भूमिका काय असेल, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान, आज इच्छुक उमेदवारांची बैठक बोलावण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे. या बैठकीत पुढील रणनीती आणि उमेदवारीबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दुसरीकडे, जयश्री पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर पक्षापासून दूर गेलेले काही कार्यकर्ते पुन्हा काँग्रेसशी संपर्क साधत असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. या अनुषंगाने संबंधित कार्यकर्त्यांनी खासदार विशाल पाटील आणि प्रतीक पाटील यांची भेट घेतल्याचे सांगण्यात येते. प्रभाग क्रमांक 11 मधून उमेदवारीबाबत चर्चा सुरू असल्याचेही सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा: सांगली जिल्ह्यात ‘आमचं गाव, आमचा विकास’ उपक्रमांतर्गत GPDP कार्यशाळा; ग्रामपंचायत प्रतिनिधींना प्रशिक्षण.
- सांगलीत युवा पिढीला तंबाखूपासून दूर राहण्याचे आवाहन; 2025-26 या वर्षात एकूण 2361 जणांचे समुपदेशन
- सांगली जिल्ह्यात 16 मेपासून जनगणना 2027 चा पहिला टप्पा सुरू; 4,421 प्रगणक घराघरात जाऊन डिजिटल घरगणना करणार
- कवठेमहांकाळ शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू; 8 वी ते पदवी विद्यार्थ्यांना मोठी संधी
- बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी ₹149 कोटींच्या आराखड्यास मंजुरी
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी










