सांगली महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज प्रक्रिया आजपासून सुरु; 31 डिसेंबरला छाननी

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
फोटो : उमेदवारी अर्ज प्रक्रियेचे प्रतीकात्मक दृश्य (प्रातिनिधिक)

सांगली : सांगली महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज स्वीकारण्याचा कालावधी 29 डिसेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत, तर 30 डिसेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत राहणार आहे. गुरुवार दि. 25 आणि रविवार दि. 28 डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

31 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजल्यापासून उमेदवारी अर्जांची छाननी सुरु होणार आहे. अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस 2 जानेवारी 2026 असा निश्चित करण्यात आला आहे.

उमेदवारी अर्ज संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात ऑफलाईन पद्धतीने उपलब्ध असून, तेथेच अर्ज स्वीकारले जाणार आहेत. प्रभाग समिती क्रमांक 2, 3 आणि 4 अंतर्गत कुपवाड, मिरज आणि सांगली येथील विविध महानगरपालिका कार्यालये, बालगंधर्व नाट्यगृह, तरुण भारत स्टेडियम तसेच अग्निशमन केंद्र येथे उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

हेही वाचा: सांगली महापालिका निवडणुकीत महायुतीतील जागावाटपावर चर्चा; भाजपचा ईतर पर्यायांचा विचार सुरू.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा