सांगली : महाराष्ट्र शासनाच्या आपले सरकार सेवा केंद्र उपक्रमांतर्गत नागरिकांसाठी विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी सुलभ व वेळेत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सांगली जिल्ह्यातील नागरिकांनी या ऑनलाईन सेवांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले आहे.
जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र, तालुकास्तरावरील सेतू सुविधा केंद्र तसेच आपले सरकार पोर्टलवर स्वतः लॉगिन करून नागरिक विविध शासकीय सेवांचा ऑनलाईन पद्धतीने लाभ घेऊ शकतात. शासनाच्या या पोर्टलवरून अनेक सेवा सहज उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
या अंतर्गत उत्पन्न दाखला, जात प्रमाणपत्र, रहिवाशी दाखला, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिक दाखला यासह एकूण ११ शासकीय सेवा ऑनलाईन उपलब्ध आहेत. या सर्व सेवा शासनमान्य असून पारदर्शक व विश्वासार्ह प्रक्रियेतून कमीतकमी वेळेत नागरिकांना देण्यात येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
प्रसिद्धी पत्रकानुसार, १ एप्रिल २०२५ पासून आजपर्यंत सांगली जिल्ह्यात ६ लाख ६२ हजार ५९८ शासकीय सेवा नागरिकांना देण्यात आल्या आहेत. यापैकी ६ लाख २९ हजार ६९० सेवा (९७.१९ टक्के) विहित कालावधीत पूर्ण करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
नागरिकांनी दलालांवर अवलंबून न राहता शासनाच्या अधिकृत पोर्टल व सेवा केंद्रांचा वापर करून वेळ, खर्च आणि श्रमांची बचत करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
- तासगाव फाट्याजवळ टेम्पोने अचानक वळण घेतल्याने अपघात; आयशर टेम्पोखाली सापडून दुचाकीस्वार गंभीर जखमी
- सांगली पेठभाग भाजी मंडईतील ₹20.50 लाखांचा काँक्रिट रस्ता 6 महिन्यांत पूर्ण होणार का? नागरिकांचे लक्ष
- सांगली पोलीस भरती 2024-25; 737 उमेदवार लेखी परीक्षेस पात्र, अधिकृत यादी जाहीर
- गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील हिप्परकर टोळी तडिपार; सांगली-सोलापूर जिल्ह्यात प्रवेशबंदी
- भिलवडीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; वाहनचालक फरार
- एनओसीवरून वाद पेटला; सांगलीत वकिलाच्या घरात घुसून धमकी, चौघांवर गुन्हा









