इराण-इस्रायल तणावामुळे तेल दर वाढणार? सांगलीत पेट्रोल 104.07 रुपये; सध्या दरवाढ नाही

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
सांगलीतील चेतना पेट्रोलियम येथे पेट्रोल 104.07 रुपये व डिझेल 90.63 रुपये दराने विक्री होत असल्याची माहिती. (प्रातिनिधिक छायाचित्र)

सांगली : मध्यपूर्वेत सुरू असलेल्या इराण-इस्रायल तणावामुळे पेट्रोल-डिझेल दर वाढणार का, याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. मात्र सध्या सांगलीतील इंधन दर स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.

सांगलीतील चेतना पेट्रोलियम (100 फुटी रोड) येथे शुक्रवारी पेट्रोलचा दर 104.07 रुपये प्रति लिटर तर डिझेलचा दर 90.63 रुपये प्रति लिटर आहे. तसेच पॉवर पेट्रोलचा दर 111.64 रुपये प्रति लिटर असल्याची माहिती पंपाच्या मालक सौ. नीता केळकर यांनी दिली.

सध्या सांगलीत पेट्रोल 104.07 रुपये, डिझेल 90.63 रुपये आणि पॉवर पेट्रोल 111.64 रुपये प्रति लिटर दराने विक्री होत आहे.

या संदर्भात प्रतिक्रिया देताना केळकर म्हणाल्या की, सध्या देशात पुरेसा इंधनसाठा उपलब्ध आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकार यांनी पेट्रोल-डिझेल दर वाढणार नसल्याची ग्वाही दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून पेट्रोलपंपांवर रांगा लावू नयेत.

मध्यपूर्वेतील घडामोडींमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या दरांबाबत चर्चा सुरू असली तरी सध्या स्थानिक पातळीवर इंधन पुरवठ्यावर कोणताही परिणाम झालेला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: विटा-कराड मार्गावर भीषण अपघात; जखमी महिलेचा 10 दिवसांनी मृत्यू.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा