Sangli Election : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? जबाबदारी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
सांगली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? | ( फोटो: Sangli Today)

Sangli Election | सांगली : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगलीच्या राजकारणात मोठी हालचाल सुरू झाली असून, दोन माजी महापौरांसह सहा माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटात प्रवेश केल्याने शहरातील राजकीय समीकरणे बदलू लागली आहेत. काही काळ संघटनात्मकदृष्ट्या कमकुवत मानली जाणारी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या घडामोडीमुळे पुन्हा ताकद मिळवत असल्याचे चित्र आहे.

या पक्षप्रवेशानंतर आणखी काही प्रभावी नेते राष्ट्रवादीत येण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणूक घड्याळ चिन्हावर स्वतंत्रपणे लढवण्याची तयारी राष्ट्रवादीकडून सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत.

दरम्यान, बदलते समीकरण लक्षात घेऊन भाजपनेही हालचाली वाढवल्या असून शिवसेना, रिपब्लिकन पार्टी, जनसुराज्य आणि रयत आघाडीसोबत संभाव्य युतीबाबत चर्चा सुरू केल्याचे बोलले जात आहे.

राज्य पातळीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट एकत्र येऊ शकतील का, याची प्राथमिक चाचपणी करण्याची जबाबदारी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सांगलीत महापालिकेच्या सर्व ७८ जागांवर लढण्याचा पर्याय खुला असल्याचे आमदार इद्रिस नायकवडी यांनी स्पष्ट केल्याने, पुढील काही दिवसांत राजकीय चित्र अधिक स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: सांगली महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; 23 ते 29 डिसेंबरदरम्यान नामनिर्देशन, 15 जानेवारीला मतदान.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा